Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला जागतिक इतिहास

डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला जागतिक इतिहास

डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला जागतिक इतिहास

प्रतिनिधी -भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवण्याचे काम केले.

आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले.

गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 122 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket