अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ग्राहक कल्याण फौंडेशनकडून तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; धाडसी निर्णयांना पाठिंबा

ग्राहक कल्याण फौंडेशनकडून तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; धाडसी निर्णयांना पाठिंबा

ग्राहक कल्याण फौंडेशनकडून तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; धाडसी निर्णयांना पाठिंबा

सातारा : ग्राहक कल्याण फौंडेशन, महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद लक्ष्मण माने, जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिलारे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धाडसी निर्णयांचे व जनहिताच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

सध्या तुकाराम मुंढे हे मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असून, ग्राहकांचे हित जपण्यासाठी त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असल्याचे फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहक संरक्षण, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंवर कारवाई, अन्नसुरक्षा आणि प्रशासनातील पारदर्शकता यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे हे केवळ निर्णय घेणारे अधिकारी नसून, घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून जनहिताला प्राधान्य देण्याची त्यांची कार्यशैली प्रेरणादायी आहे.

ग्राहक कल्याण फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले की, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणारे अधिकारी समाजासाठी मोठा आधार ठरतात. त्यांच्या मते, तुकाराम मुंढे यांचे कार्य अनेक नागरिकांसाठी आश्वासक असून, जनहितासाठी त्यांनी दाखविलेली निष्ठा आणि प्रामाणिक प्रशासनाची भूमिका अनुकरणीय आहे.

यावेळी ग्राहक कल्याण फौंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, ग्राहकहित आणि जनहितासाठी त्यांचे कार्य असेच सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket