मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह पाचगणी नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीपभाऊ बगाडे विजयी महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १९ वा वर्धापनदिन व संस्थापक नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार एपस्टीन फाईलमधील उल्लेखाचं सरकारने स्पष्टीकरण द्यावे – पृथ्वीराज चव्हाण
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » कूपरला राष्ट्रीय स्तरावर चार पुरस्कार

कूपरला राष्ट्रीय स्तरावर चार पुरस्कार

कूपरला राष्ट्रीय स्तरावर चार पुरस्कार”

साता-यातील सर्वात मोठा उद्योग कूपर कॉर्पोरेशनने आपली उत्कृष्टतेची परंपरा चालू ठेवत नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या दोन वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये चार प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले ‘मॅन्युफॅक्चरींग टुडे’ या उद्योग क्षेत्रातील नावाजलेल्या मासिक पत्रिकेच्या माध्यमातून “मॅन्युफॅक्चरींग टुद्दे अॅवार्ड 2025” चे आयोजन नुकतेच मुंबई येथे केले 

सदरील पुरस्कार उद्योग जगतातील नाविण्यपूर्ण उत्पादन, ओद्योगिक सुरक्षितता व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या क्षेत्रात दिले जातात. कूपर कॉपोरेशनच्या इंजिन प्लान्टला “एक्सलन्स इन ईएचएस 2025” या कॅटेगरी मध्ये पुरकार मिळाला तर कूपर कॉर्पोरेशनच्या मानव संसाधन विभागातील नियोजन व प्रभावी व्यवस्थापन यासाठीचा “एक्सलन्स इन वर्क फोर्स 2025” हा प्रथम पुरस्कार मिळाला.

त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून आयोजलेल्या 28 व्या रेग्युलेटिंग एजन्सीज् अॅण्ड सेफ्टी प्रोफेशनल्स मिट या कार्यक्रमात कूपर कॉर्पोरेशनला औद्योगिक सुरक्षितेबद्दल “मेरिटोरियम परफॉर्मन्स 2024” हा पुरस्कार इंजिन प्लान्टने पटकावला तर महाराष्ट्र सुरक्षा परिषदेने आयोजन केलेल्या “मराठी घोषवाक्य स्पर्धा 2025” हा पुरस्कार कूपर कॉर्पोरेशनचे श्री संतोष महामुलकर यांनी द्वितीय पुरस्कार मिळविला महाराष्ट्र सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून औद्योगिक आस्थापणामध्ये सुरक्षितेची जाणीव व बांधिलकी निर्माण करण्यासाठी विविध पुरकार दिले जातात.

या पुरस्काराबद्दल कूपर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा.श्री.फरोख कूपर साहेब यांनी इंजिन प्लान्ट मधील सर्व कामगार कर्मचारी, सुरक्षा विभाग तसेच मानव संसाधन विभागातील कर्मचारी व अधिका-यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Post Views: 616 मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेनंतरही कराड भाजपाच्या हातातून निसटले; आमदार अतुल भोसले यांच्या कूचकामी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह कराड(अली मुजावर )प्रतिनिधी

Live Cricket