कूपर कॉर्पोरेशनला द मशिनिस्ट अवॉर्ड
द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स, वर्ल्डवाइड मीडिया (टाइम्स ग्रुप) द्वारे आयोजित द मशिनिस्ट सुपर शॉप फ्लोअर अवॉर्ड्स- २०२४ पुरस्कारांची 10वी आवृत्ती पुरस्कार समारंभ २७-जून-२४ रोजी ITC कोहिनुर हॉटेल, हैदराबाद तेलंगणा येथे पार पडला. या नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळयात जे-१ प्लांट ला विजेता ‘गुणवत्तेत उत्कृष्टता मध्यम श्रेणीमध्ये’ पुरस्कार मिळाला. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनी तर्फे श्री शंकर खामकर (जे-१ प्लांट क्वालिटी मॅनेजर) आणि श्री आशपाक मुल्ला (क्यूएमएस मॅनेजर) यांनी स्वीकारला.
द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड्स हा देशातील स्वतंत्र उत्पादन उद्योगासाठी भारतातील पहिला आणि एकमेव रेड कार्पेट सोहळा आहे.2015 मध्ये सुरु झालेल्या या प्लॅटफॉर्मने गेल्या नऊ वर्षांत त्याची विश्वासार्हता, उद्योग स्वीकार आणि लोकप्रियता याद्वारे एक बेंचमार्क तयार केला आहे.
मागील वर्षी सुद्धा आवृत्ती पुरस्कार समारंभात कूपर कॉर्पोरेशनला मानवी संसाधनात उत्कृष्टता SME श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला होता. कूपर कॉर्पोरेशन चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख एन. कूपर यांनी सर्व कामगार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.