Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत कूपर कॉर्पोरेशन विजेते

ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) च्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ACMA मोबिलिटी फाउंडेशनने (AMF) तर्फे पुणे येथे १७ व्या वार्षिक एचआर समिट वेस्टर्न रिजनचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. फ्युचर रेडी एचआर शेपिंग पीपल, टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट ही यंदाच्या समिटची मध्यवर्ती संकल्पना होती. या समिटमध्ये एचआर व्यवस्थापन, ईएसजी इंटिग्रेशन, तसेच नवीन कामगार संहितांमध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा (Artificial Intelligence) वापर अशा समकालीन विषयांतर सखोल आणि अभ्यासपूर्ण सत्रे पार पडली उद्योग क्षेत्रातील आघाडीचे तज्ञ, धोरणनिर्माते आणि एचआर व्यावसायिक यांच्या उपस्थितीमुळे या चर्चासत्रांना विशेष परिमाण लाभले.

AMF उपक्रम समावेशक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत मोबिलिटी इकोसिस्टम घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असून, ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील जलद बदल आणि नव्या युगातील उद्योजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याचा त्यामागील हेतू आहे. या समिट अंतर्गत आयोजित ६ व्या ACMA एचआर बेस्ट प्रॅक्टिसेस स्पर्धेत नामांकित संस्थांमधून १८ संचासोबत झालेल्या स्पर्धेत कूपर कार्पोरेशनने हा उपविजेत्या पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. संपूर्ण संस्थेमध्ये प्रशिक्षण व विकास प्रक्रिया मानकीकृत, सुसंगत आणि परिणामकारक करण्यासाठी ‘ई-एकलव्य या इन-हाऊस डिजिटल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टमची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व कंपनीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. नितीन देशपांडे यांनी केले, तर प्रणालीचा विकास श्री. स्वप्नील सांडगे यांनी साकारला आणि प्रशिक्षण व विकास पथकाने त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. डिजिटल परिवर्तन, संघटनात्मक उत्कृष्टता आणि भविष्यास सज्ज कार्यबल उभारणीसाठी असलेली कंपनीची ठाम वचनबद्धता या यशातून अधोरेखित झाती आहे.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख एन.कूपर यांनी या उत्लेखनीय यशाबद्दल एचआर टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket