भांबवली येथे दहा वनराई बंधाऱ्यांची निर्मिती : ग्रामस्थ व वन विभागाचा संयुक्त उपक्रम
सातारा -यावर्षी भरपूर पाऊस पडला असला तरी पाऊस उघडल्यानंतर पाण्याचे स्त्रोत असलेले ओडे, ओहोळ, झरे आटू लागले असून भविष्यातील पाणीटंचाई ओळखून पाण्याची बचत व शेतीला पाण्याची बचत व वन्य प्राण्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने भांबवली गावातील ग्रामस्थ, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समितीचे स्वयंसेवक, भांबवली वन समितीचे स्वयंसेवक, भांबवली ग्रामस्थ महिला यांनी सर्वांनी मिळून भांबवली येथे दहा वनराई बंधारे तयार करून वाहून जाणारे पाण्याची साठवण केली आहे.
पाऊस थांबल्यानंतर ओढे, नाले यांच्या मधून वाहून जाणारे पाणी ग्रामस्थ व वन विभागाचे कर्मचारी यांनी मिळून भांबवली गावातील वनक्षेत्रात वनराई बंधारे श्रमदानातून तयार करण्यात आले आहेत. रोहोट परिमंडळात लोक उपयोगी उपक्रम वन विभागामार्फत राबवले जात आहेत. रात्रगस्त, ग्रामस्थांच्या सोयीनुसार बैठका, वनविभाग आपल्या दारी, मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे कामी वना शेजारील लोकांना मोठ्या प्रमाणात जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून मानव वन्यजीव संघर्ष बाबत जनजागृती, वनवा बंदी, निसर्ग संवर्धन, ग्रामस्थांच्या सतत बैठका, असे विविध उपक्रम सतत राबवले जात आहेत. ओढ्यावरील वनराई बंधारा निर्माण झाल्यामुळे वन्यप्राणी यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. यावेळी श्रमदानासाठी आत्माराम मोरे, राजू मोरे, चंद्रकांत मोरे, तसेच ग्रामस्थ हजर होते.
मा. वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. संदीप जोपळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल राजाराम काशीद वनरक्षक प्रकाश शिंदे, तुषार लगड, जयंत निकम वनराई बंधाराचे काम करत आहेत.
रोहोट परिमंडळ मधील भांबवली येथे लोक सहभागातून सिमेंट ची पोती घेऊन वनराई बंधारे तयार करण्यात आले. वनराई बंधाऱ्यांमुळे वाहून जाणारे पाणी अडवून वन्यप्राण्यांना उपलब्ध होणार आहे.
राजाराम काशीद वनपाल रोहोट




