Home » देश » काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख

सातारा -राष्ट्रीय काॅंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्राद्वारे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देत ही नियुक्ती जाहीर केली.

रणजितसिंह देशमुख यांनी यापूर्वी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी पुणे येथील आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली आहे. तसेच पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. खटावसारख्या दुष्काळी तालुक्यात हरणाई सहकारी सूतगिरणीची आणि माण तालुक्यात माणदेशी सहकारी सूतगिरणीची यशस्वी उभारणी करत हजारो लोकांना रोजगार निर्मिती करून दिली आहे.

सुसंस्कृत,उच्चविद्या विभूषित, चारित्रसंपन्न, निष्ठावान कार्यकर्त्याची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसजनांतून आनंद व्यक्त होत आहे. विशेषतः युवा काँग्रेसजनातून मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket