नगरसेविका हेमलता सागर भोसले यांना पितृशोक
कराड : आगाशिवनगर, कराड येथील कै. सीताराम सांडगे (वय ७९) यांचे दुःखद निधन झाले. ते नगरसेविका हेमलता सागर भोसले यांचे वडील होत.
कै. सीताराम सांडगे यांनी किर्लोस्कर कंपनी मधील क्वालिटी कंट्रोल विभागात इंचार्ज पदावर कार्य केले होते. आपल्या प्रामाणिकपणा, शिस्तबद्ध कामकाज आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांनी कंपनीत व समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती.
वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर व परिसरावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून भोसले कुटुंबीयांप्रती सांत्वन व्यक्त करण्यात येत आहे.




