अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

सातारा: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत विविध उपकंपन्यांमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यव्सथापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांनी केले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अखत्यारीतील पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण नाईक आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी योजना राबविण्यात येत आहेत

महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज योजना तसेच गट कर्ज योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून स्वयंरोजगार, व्यवसायवृद्धी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिल्डिंग, सर्व्हे क्र. २२-अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ, सातारा येथे संपर्क साधावा.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या या आर्थिक विकास योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार व आर्थिक प्रगतीची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण म. गिन्हे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket