वडगावमध्ये चिमुकल्यांचा प्रतिकात्मक दिंडी सोहळा
तांबवे –आषाढी एकादशीचे औचित्य साधून वडगाव हवेली ता. कराड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर यांच्यावतीने विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या दिंडीमधील पालखी, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज ग्रंथाचे पुजन संस्था संचालक जे. के. जगताप, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच राजेंद्र थोरात, संतोष सांळुखे यांची उपस्थिती होती, यावेळी संस्था सचिव डी ए पाटील, संचालक डॉ सुधीर जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.दिंडी मध्ये वेशभूषेतील विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम महाराज , वासुदेव यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच वारकरी वेषातील लहान मुले, मध्यभागी पालखी, भगव्या पताका, टाळ मृदंग वाजवत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या जय घोषात, विठुनामाचा गजर अशा वातावरणामध्ये दिंडी सोहळा रंगला.
या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या वतीने नियोजन मुख्याध्यापक प्राथमिक डी. पी. पवार, मुख्याध्यापिका व्ही. एच. कदम यांनी केले. दिंडीचे स्वागत ठिक ठिकाणी महिलांनी औक्षण केले.
ग्रापंचायत प्रांगणात रिंगण सोहळा, झिम्मा फुगडी हे खेळ मुली खेळल्या. या दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी एन. एस. पोळ, ए. एल. पाटील, एस. एम. आवटे, एन. एस. कराळे, एल. जे. कुंभार, ए, एल. लोकरे, एम. एस. सकटे, एम. एस. पाटील, एम. डी. पाटील, अश्विनी सांळुखे आदीं शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी दादा पाटील, अब्दुल मुल्ला, शिवाजी चव्हाण व व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांचे योगदान लाभले.