अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य योजनेची सेवा सातारा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य योजनेची सेवा सातारा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य योजनेची सेवा सातारा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

सातारा – मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य योजने अंतर्गत उपचारांचे लाभ सातारा हॉस्पिटल येथे उपलब्ध झाले असून त्याचा फायदा गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन सी ई ओ विक्रम शिंदे यांनी केले.

रविवार पेठेतील सर्वोदय हाउसिंग सोसायटीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वोदय मंडळाने या शिबिराचे आयोजित केले होते. सातारा हॉस्पिटल रिसर्च सेंटर अँड प्रायव्हेट लिमिटेड, श्री टेके आय क्लिनिक सेंटर, बालाजी ब्लड बँक व माधवबाग यांच्या संयोजनाने हे शिबीर झाले. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज संयुक्त जयंती निमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात रक्त शर्करा, रक्तदाब, हृदयाची तपासणी मध्ये ईसीजी, जनरल चेक अप अंतर्गत विविध आजारांचे मार्गदर्शन तसेच अस्थिरोग तज्ञ, डोळ्यांची तपासणी करण्यात आली 

यावेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. माधवबाग या संस्थेकडून हृदयविकार मधूमेह घ्यावयाची काळजी या विषयावर, तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले .या शिबिरास पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती ॲड. मोनीका घोरपडे, प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक सचिन पाटोळे, उद्योजक रविराज घोरपडे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष सागर सावंत, मंडळाचे उपाध्यक्ष हेमंत रणपिसे तसेच विजय सावंत, श्रीमती खाडे, प्रदीप भोसले, उमेश धसके, राजू भोसले, योगेश सावंत, राहुल बनसोडे, अजित सावंत, आकाश सावंत, मंडळाचे तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच पेठेतील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket