मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवा – आ. मकरंद पाटील
सनी चव्हाण मित्रपरिवार सायली कट्टा सिध्दनाथवाडी आयोजित जननायक आ. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिला मेळाव्यात 162 ऑनलाईन अर्ज व 12 ऑफलाईन असे 174 अर्ज भरून घेण्यात आले.महिला मेळावाला महिलांनी खूप गर्दी केली होती. या योजनेपासून कोणीही महिला वंचीत राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मेळावा आयोजित केला होता.
तसेच वाई व खंडाळा तालुक्याला 44 कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर करून आणल्याबद्दल व त्यातील सिध्दनाथवाडीत 10 लाख च्या वर दुष्काळ निधी मिळाल्याबद्दल सिध्दनाथवाडीतील शेतकऱ्यांच्या वतीने मा. मकरंद आबा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.किसनवीर व खंडाळा साखर कारखान्याला 550 कोटी रुपयांची थकहमी मिळवून आणल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.
सिध्दनाथवाडी विकास सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. अविनाश मोरे यांचा आमदार मकरंद आबा पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला व सिध्दनाथवाडीतील शेतकऱ्यांच्या दुष्काळ निधी साठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल श्री. बापूराव खरात यांचा सन्मान मा. आ. मकरंद आबा पाटील यांनी केला.
लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचवा. त्यासाठी गावोगावी कॅम्प आयोजित करा. सरकार योग्य पद्धतीने काम करते आहे.सरकारला साथ द्या असे आ. मकरंद आबांनी बोलताना सांगितले.आबा आमचे सरकार पण तुम्ही आणि मुख्यमंत्री पण तुम्ही आणि उपमुख्यमंत्री पण तुम्ही तुमच्या दरबारात आलेल्या प्रश्नाचा निपटारा होत नाही असे कधी झाले नाही. त्यामुळं वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील जनतेचे तुम्हीच मुख्यमंत्री असे सनी चव्हाण यांनी बोलताना सांगितले.