मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांचे खंडाळा येथे पुरुषोत्तम जाधव यांनी केले स्वागत
खंडाळा -महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब सातारा जिल्हा दौऱ्यावरती आले असता त्यांचे स्वागत पुरुषोत्तम जाधव यांनी केले.ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त नायगाव, ता. खंडाळा येथे आयोजित सावित्रीबाई जयंती उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खंडाळा तालुक्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची नायगाव मांढरदेवी रस्त्या संदर्भात, आणि वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून येणारा काळामध्ये सर्व प्रलंबित प्रश्न निश्चितच मार्गी लावण्याचे आश्वासन पुरुषोत्तम जाधव यांना दिले.