अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

सातारा – महसूल विभागाशी संबंधीत सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय शासनामार्फत घेण्यात आले आहेत. उदा. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक नसणे, सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्ययावतीकरण इत्यादी. सदर सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार अभियान तीव्र स्वरूपात राबविणे आवश्यक आहे.

महसूल विभागामधील सुधारणांचा लाभ सर्व सामान्य जनतेला करुन देणेसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.। दिनांक 18 फेब्रुवारी, 2026 से 15 में, 2026 या कालावधीत राबविणेत येणार आहे.

याअभियानामध्ये शिबीर आयोजित करुन प्रामुख्याने खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध करून देणेत येणार आहे.

प्रलंबित फेरफार निकाली काढणे.अभिलेख दुरुस्ती , . लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत तात्काळ सेवा उपलब्ध करुन देणेत येणार आहे. (सर्व प्रकारचे दाखले वाटप करणे व इतर सेवा),

अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ होईल यादृष्टीने कार्यवाही 5. भूसंपादन केलेल्या व अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाय दप्तरअद्यावत करणेत येणार आहे.,

 

Ease of Doing Business सुधारणा य नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेत येणार आहे., ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पी एम किसान, बाबत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ होण्याच्या दृष्टीने नियोजन करुन कार्यवाही करणेत येणार आहे.

आंबवडे मंळळ – जोतीराम लाड मंगल कार्यालय करंजे तर्फ परळी ०७ मार्च २०२६

 वडूथ मंडळ – साई आशिर्वाद मंगल कार्यालय आरफळ ०७ मार्च २०२६

तासगांव मंडळ – इंद्रनिल मंगल कार्यालय जैतापूर ०७ मार्च २०२६.

अपशिंगे मंडळ – अर्सेंम्ब्ली हॉल अपशिंगे – १४ मार्च २०२६

परळी मंडळ – श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी, १४ मार्च २०२६

वर्ये मंडळ – जिजाबा आण्णा सांस्कृतीक भवन गोवे, १४ मार्च २०२६.

कण्हेर मंडळ – गणेश मंदीर हॉल साबळेवाडी, १० एप्रिल २०२६.

शेंद्रे मंडळ – कुमठे विठठल रुक्मिनी मंगल कार्यालय, १० एप्रिल २०२६.

 कोडोली मंडळ – सांस्कृतीक भवन कोडोली १० एप्रिल २६.

. खेड मंडळ – बाळसिध्दनाथ मंदीर म्हसवे, एप्रिल २०२६.

. दहिवड मंडळ – केदारेश्वर मंदीर रोहोट १७ एप्रिल २०२६

नागठाणे मंडळ – वरद मंगल कार्यालय नागठाणे १७ एप्रिल २०२६

करंजे त. सातारा मंडळ – पोलिस करमणूक केंद्र तालीम संघाजवळ ८ मे २०२६.

सातारा मंडळ – पोलिस करमणूक केंद्र तालीम संघाजवळ सातारा- १५ मे २०२६.

तरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून पात्र लाभार्थी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थी यांनी सदर शिबिरारमध्ये त्यांना आवश्यक असणाऱे दाखले उपलब्ध करुन घेण्याचे आवाहन आशिष बारकुल, उपविभागीय अधिकारी सातारा यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket