चाफळ बिटच्या शिक्षकांनी साकारलेली वाघ्या मुरळीची थीम पाटणच्या ९ बीटमधील लोककलेने जिंकली मने
चाफळ बीटची ‘वाघ्या-मुरळी’ थीम ठरली आकर्षणाचे केंद्र
चाफळ(उमेश सुतार) –साताऱ्यातील ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल (शाहू स्टेडियम) येथे जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे अत्यंत दिमाखात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात पाटण तालुक्यातील एकूण 9 बीटामध्ये 9 मिनिटातील अत्यंत सुंदर कला सादरीकरण केले, सर्व सहभागी शिक्षक शिक्षिका विविध खात्यातील कर्मचारी वर्ग व अधिकारी वर्ग अत्यंत सूक्ष्म नियोजन करून आपण सर्वांनी तन मन धन अर्पूण सादर केलेल्या महाराष्ट्रातील लोककलेने उपस्थित प्रेक्षकांची आणि मान्यवरांची दाद मिळवली.
संपूर्ण सादरीकरणात चाफळ बीटची ‘वाघ्या-मुरळी’ ही थीम विशेष लक्षवेधी ठरली. या थिमद्वारे महाराष्ट्राची गौरवशाली लोकपरंपरा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिवंत केली. या सादरीकरणातील ऊर्जा आणि पोशाखांची निवड यामुळे चाफळ बीटने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण, शिस्तबद्ध संचलन आणि अप्रतिम पोशाख विविधतेमुळे संपूर्ण स्टेडियमवर सांस्कृतिक रंगांची उधळण पाहायला मिळाली.
जिल्हा परिषदेच्या या महोत्सवाचे आयोजन अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संघ भावना आणि क्रीडा कौशल्य वाढवण्यासाठी करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्याचा दबदबा कायम राखण्यामध्ये सर्व सहभागी शिक्षक शिक्षिका, विविध खात्यातील कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग तालुक्याच्या गटविकास अधिकारी सरिता पवार, गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, केंद्र संचालक, केंद्र क्रीडा समन्वयक, शालार्थ टीम, तालुका क्रीडा समन्वयक सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका,अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले.





