अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » महाबळेश्वरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; ‘जय भीम’च्या जयघोषाने पर्यटननगरी दुमदुमली

महाबळेश्वरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; ‘जय भीम’च्या जयघोषाने पर्यटननगरी दुमदुमली

महाबळेश्वरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; ‘जय भीम’च्या जयघोषाने पर्यटननगरी दुमदुमली

महाबळेश्वर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज महाबळेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मध्यरात्रीपासूनच भीम अनुयायांचा उत्साह ओसांडून वाहत होता. शहरातील मुख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषाला विनम्र अभिवादन करण्यात आले.

आज पहाटेपासूनच महाबळेश्वर शहरात एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळाले. निळ्या रंगाचे ध्वज आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर सुशोभित झाला होता. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळा परिसरात मोठी गर्दी केली होती.

सकाळी महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अधिकृतपणे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे, मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील, उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलानी आणि विरोधी पक्षनेते श्री. कुमार भाऊ शिंदे उपस्थित होते. याशिवाय नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्याने सध्या येथे पर्यटकांची मोठी वर्दळ आहे. विशेष म्हणजे, स्थानिक अनुयायांसोबतच पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून अनेकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा आनंद घेतला.

जयंतीनिमित्त आयोजित रॅली आणि अभिवादन सभेवेळी “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” आणि “जय भीम” अशा घोषणांनी संपूर्ण महाबळेश्वर परिसर दुमदुमून निघाला होता. सर्वत्र अतिशय उत्साही पण शिस्तबद्ध वातावरणात हा सोहळा पार पडला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket