Home » देश » धार्मिक » कै.विजय धनावडे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त धनावडे कुटुंबियांची आसनी शाळेस २५ हजार रुपये देणगी

कै.विजय धनावडे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त धनावडे कुटुंबियांची आसनी शाळेस २५ हजार रुपये देणगी

कै.विजय धनावडे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त धनावडे कुटुंबियांची आसनी शाळेस २५ हजार रुपये देणगी

केळघर,ता:८:आसनी शाळेच्या भौतिक सुविधा परिपूर्ण होण्यासाठी धनावडे कुटुंबीय सातत्याने शाळेस भरीव मदत करत असून धनावडे कुटुंबियांची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे .वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सागर धनावडे यांनी आसनी शाळेस वेळोवेळी सहकार्य केले आहे.धनावडे कुटुंबियाचे हे दातृत्व प्रेरणादायी आहे.असे मत आसनी शाळेचे मुख्याध्यापक संपत शेलार यांनी व्यक्त केले.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर धनावडे यांनी आपले वडील कै.विजय धनावडे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त आज आसनी शाळेस २५हजार रुपये देणगी म्हणून दिले. व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात शेलार बोलत होते. याप्रसंगी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर धनावडे,विश्वनाथ धनावडे, संजय धनावडे, पांडुरंग धनावडे, तुषार धनावडे, प्रवीण पाटणे, प्रफुल्ल शेलार, संजीवन निकम, शशिकांत शेलार, सुषमा खटावकर, श्री. कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सागर धनावडे म्हणाले, आसनी प्राथमिक शाळा पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. या शाळेने अनेकांना घडवले असून कित्येक आयुष्याना या शाळेमुळे कलाटणी मिळाली आहे. वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेस आर्थिक मदत दिली आहे. यापुढेही शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. विश्वनाथ धनावडे यांनी स्वागत केले. तुषार धनावडे यानी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Post Views: 95 पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप

Live Cricket