ध्येय निश्चितीचा ध्यास हाच यशाचा खरा गुरुमंत्र – श्रीरंग काटेकर
कर्ण फाउंडेशन तर्फे सीए वैष्णवी जंगम चा सत्कार
सातारा- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटट ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत सातारची वैष्णवी सावळाराम जंगम हिने नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल कर्ण फाउंडेशन सातारा यांच्यामार्फत तिचा शाल श्रीफळ बुके व सातारी कंदी पेढे देऊन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते उचित सत्कार करण्यात आला.
यावेळी कर्ण फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे, दत्तात्रय सांगलीकर, विजय कुलकर्णी ,कुमार लोखंडे, सावळाराम जंगम , सौ.कमल जंगम अदि प्रमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की जीवनात ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते हे सीए झालेल्या वैष्णवी जंगम हिने सिद्ध करून दाखविले आहे तिने प्राप्त केलेल्या यशाचा सर्व सातारकरांना अभिमान वाटतो.
कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले की कर्ण फाउंडेशन नेहमीच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा नेहमीच सन्मान व सत्कार केला जातो वैष्णवी जंगम हिने प्राप्त केलेले यश हे कौतुकास्पद आहे.
सीए वैष्णवी जंगम म्हणाली की सीए परीक्षेत उज्वल यश प्राप्तीसाठी केलेले कठोर परिश्रम कामी आले आई-वडिलाची वेळोवेळी लाभलेले साथ माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली.
कठोर परिश्रम हाच यशाचा खरा गुरु मंत्र प्रतिकूल परिस्थितीशी झगडत वैष्णवी जंगम हिने सीए ची पदवी प्राप्त केली यासाठी तिने कठोर परिश्रमाबरोबर संयमीवृत्ती ठेवून हे यश प्राप्त केले. जीवनात जिद्द चिकाटी व सकारात्मक दृष्टिकोन असेल तर अशक्य हे शक्य करता येते .