Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दिवाळी नितीन पाटील होणार राज्यसभेवर खासदार 

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दिवाळी नितीन पाटील होणार राज्यसभेवर खासदार 

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात दिवाळी साजरी नितीन पाटील होणार राज्यसभेवर खासदार 

लोकसभेच्या सातारा जागेवरील दावा सोडणाऱ्या नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेण्याचा शब्द अजित पवार यांनी वाई येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान शब्द दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून पियुष ओयल यांच्या रिक्त जागी पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नितीन पाटील मुंबईला दाखल झाले आहेत. महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई विधान भवनात अर्ज भरण्यात येणार आहे. ही निवड बिनविरोध करण्यासाठी महायुतीची रणनिती असल्यामुळे नितीन पाटील खासदार होणार जवळपास निश्चित झाले आहे.

सातारा जिल्ह्याला खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या रुपाने खंबीर आणि कणखर नेतृत्व नेतृत्व मिळाले होते. आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी त्यांची धुरा सांभाळली वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात आ.मकरंद पाटील हॅट्रिक करून मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. नितीन पाटील सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यातच त्यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्याने वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघात दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे.राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याने 

सातारा जिल्ह्यात युवा खासदार मिळाले असून निश्चितच येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यातील विकास कामांना गती मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सातारा जिल्ह्यावर असणारी पकड अजून मजबूत होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न. 

उत्कर्षाच्या शिखरावर कार्यक्रमात प्रा नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न.  उत्कर्ष पतसंस्था आयोजित “उत्कर्षाच्या

Live Cricket