Home » राज्य » प्रशासकीय » व्यापारी पतसंस्थेचा सभासदांना १५% लाभांश

व्यापारी पतसंस्थेचा सभासदांना १५% लाभांश

व्यापारी पतसंस्थेचा सभासदांना १५% लाभांश

सातारा प्रतिनिधी -सातारा शहराची अर्थवाहिनी म्हणून नावलौकिक असणा-या व्यापारी सहकारी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष मा.सतिश जाधव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. प्रस्तावना श्री सुदीप भट्टड यांनी केली.

संस्थेचे चेअरमन दिलीप पिलके यांनी उपस्थित सभासदाचे स्वागत करून संस्थेचा आर्थिक लेखाजोखा सभासदांच्या समोर मांडला सुज्ञ सभासदांचा संस्थेच्या कामकाजावरील असणा-या अतूट विश्वासामुळे संस्था सतत ३५ वर्षे नफ्यात असून ऑडिटचा ‘अ’ वर्ग मिळवत आली आहे. याही वर्षी संस्था आपले सभासदांना १५% लाभांश देत असलेचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

संस्थेचे सध्या ५२०८ इतके सभासद असून भाग भांडवल १.४३ कोटी तर ठेवी २३ कोटीच्या आहेत. कर्ज १९ कोटी असून गुंतवणूक ११ कोटीची आहे. संस्थेचा एन.पी.ए. ०% आहे. ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात संस्थेस ६७ लाख नफा झालेला आहे. संस्थेने केवळ नफा मिळविणे एवढाच उद्देश न ठेवता समाजाप्रती आपले काहीतरी देणे लागतो या भावनेतून संस्था विविध उपक्रम राबवित आली आहे.

यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद व कायदेशीर सल्लागर अॅड. सुभाष मुंढेकर, माजी नगराध्यक्ष श्री. अच्युत गोडबोले, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी अधिकारी श्री. गजानन बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच जिल्हा सहकारी बोर्डाचे अधिकारी श्री. सुरवसे साहेब यांनी सहकारातील नवीन बदल व उपविधी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दिलीप पिलके, व्हा. चेअरमन शिवप्रसाद मिणीयार, संचालक, कर्मचारी, सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका सौ. रजनीताई कदम यांनी आभार व्यक्त केले.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket