आर्थिक वर्ष 2024 मध्ये व्यवसाय वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल.
बैंक ऑफ महाराष्ट्र ने सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये एकूण व्यवसाय आणि ठेवी जमा करण्याच्या बाबतीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे जेव्हा बहुतेक कर्जदारांना दुहेरी अंकी वाढ साध्य करण्यात अडचणी येत आहेत.
बैंक ऑफ महाराष्ट्र ने एकंदर व्यवसायात (देशांतर्गत) या वित्तीय वर्षात 15.94 टक्के वाढ नोंदवली आहे, या पाठोपाठ देशातील प्रमुख सार्वजनिक बैंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने 13.12 टक्के वाढ नोंदवली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीच्या संदर्भातील प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा एकंदर व्यवसाय (ठेवी आणि कर्ज) हा 79,52,784 कोटी रुपये एवढा आहे. या तुलनेत बैंक ऑफ महाराष्ट्र चा एकंदर व्यवसाय 4,74,411 एवढा आहे. तुलनात्मक विचार केला तर एसबीआय चा व्यवसाय बैंक ऑफ महाराष्ट्र च्या तुलनेत सुमारे 16.7 पटीने जास्त आहे.
ठेवी जमा करण्याच्या वाढी बाबतीत बैंक ऑफ महाराष्ट्र ने 15.66 टक्क्यांसह आपले सर्वोच्च स्थान आर्थिक वर्ष 2024 मध्ये कायम ठेवले आहे. या तुलनेत एसबीआय चा हा आकडा 11.07 टक्के, बैंक ऑफ इंडिया 11.05 टक्के आणि त्या पाठोपाठ कॅनरा बँकेचा 10.98 टक्के एवढा आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील एकंदर 12 बँकांपैकी फक्त या चारच बँकांना ठेवींच्या संदर्भात या आर्थिक वर्षात दोन आकडी वाढ नोदविण्यात यश आले आहे.
लो कॉस्ट मानल्या जाणाऱ्या कासा ठेवींच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र 52.73 टक्क्यांसह चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्या पाठोपाठ सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया 50.02 टक्क्यांसह वर्ष 2024 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मोठ्या संख्येतील चालु खाती आणि बचत खाती यामुळे बँकेला आपली कर्जे तुलनेने कमी खर्चात देणे शक्य होते.
कर्ज रकमेच्या वाढीचा विचार केला तर कोलकाता स्थित युको बैंक 16.38 टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर असून त्या पाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्रने 16.30 टक्के एवढी वाढ नोदविली आहे तर एसबीआय ने 16.26 टक्के वाढ नोंदवली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांनी दिलेल्या कर्ज रकमेची वाढ या आर्थिक वर्षात 16 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी होती.
भांडवलाच्या दर्जाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि एसबीआय यांनी ग्रॉस एनपीए च्या बाबतीत उत्तम कामगिरी केली असून दोनही बँकांची ही संख्या अनुक्रमे 1.88 टक्के आणि 2.24 टक्के एवढी 31 मार्च 2024 रोजी आहे. एकंदर नेट एनपीए चा विचार केला तर बैंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँक यांचा हा आकडा सगळ्यात कमी असून अनुक्रमे 0.2 टक्के आणि 0.43 टक्के एवढा आहे.
31 मार्च 2024, रोजी भांडवल उपलब्धता प्रमाणाचा विचार केला तर बैंक ऑफ महाराष्ट्र 17.38 टक्क्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोच्च असून त्या पाठोपाठ 17.28 टक्क्यांसह इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बैंक 17.16 टक्क्यांसह पुढील क्रमांकावर आहे.
