महायुतीला साथ देऊन आपले सरकार आणा आ.शिवेंद्रसिंहराजे;भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )सातारा तालुक्यात गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद महायुती सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवून गोर- गरीब, कष्टकरी, शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना न्याय दिला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे हक्काचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व उमेदवारांना साथ देऊन आपले हक्काचे सरकार पुन्हा सत्तेत आणा, असे आवाहन सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा तालुक्यातील शेंद्रे, परळी, कोंडवे आणि लिंब जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचे गावभेट दौरे उत्साहात सुरु आहेत. गावभेट दौऱ्यात शिवेंद्रसिंहराजे प्रत्येक गावातील भेट देत असून ग्रामस्थांशी, माता- भगिनींशी संवाद साधत आहेत. ठिकठिकाणी शिवेंद्रसिंहराजे, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे उत्साहात, जल्लोषात स्वागत केले जात आहे. प्रत्येक गावात, वाडी- वस्तीवर डांबरी रस्ता पोहचला आहे. अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. जल जीवन मिशन योजनेद्वारे शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा केला आहे. शाळा खोल्या, समाजमंदिर यासह आरोग्य सेवा सक्षम केली आहे.
प्रत्येक गावाचा कायापालट करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. सर्वप्रकारची विकासकामे मार्गी लागल्याने आज गावात कोणते विकासकाम करायचे असा प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे, हि वस्तुस्थिती आहे. प्रत्येक गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारचे सहकार्य आपल्याला लाभले आहे आणि म्हणून महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत आले पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. प्रत्येक गावागावातून शिवेंद्रसिंहराजेंना मोठा पाठिंबा मिळत आहे. शिवेंद्रसिंहराजेंना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्याचा निर्धार सर्व गावातील ग्रामस्थांनी याप्रसंगी केला.
