सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » राज्यस्तरीय ‘आविष्कार स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, फार्मसी विभागाची उज्ज्वल कामगिरी

राज्यस्तरीय ‘आविष्कार  स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, फार्मसी विभागाची उज्ज्वल कामगिरी

राज्यस्तरीय ‘आविष्कार  स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, फार्मसी विभागाची उज्ज्वल कामगिरी

सातारा -वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या आयोजनाखाली झालेल्या राज्यस्तरीय ‘आविष्कार  संशोधन स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पस, फार्मसी विभाग, सातारा येथील विद्यार्थिनीने उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.

या प्रतिष्ठित स्पर्धेत कु. श्रद्धा सुधीर सावंत या विद्यार्थिनीने प्राणीशास्त्र, कृषी व पशुवर्धन या विषय क्षेत्रात राज्यस्तरीय चौथा क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे पार पडली.महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून निवड झालेल्या ६३ स्पर्धकांमधून श्रद्धा सावंत हिची निवड होऊन तिने हे यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थिनीचा सन्मान माननीय कुलगुरू डॉ. करभारी काळे, कुलसचिव डॉ. अमोल शेष व अधिष्ठाता डॉ. संजय नलबलवार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन करण्यात आला. यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनीच्या संशोधनात्मक कार्याचे विशेष कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दशरथ सगरे, उपाध्यक्ष मा. डॉ. अजिंक्य सगरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव, फार्मसी विभागप्रमुख डॉ. ए. एम. भागवत, एम. फार्म विभागप्रमुख डॉ. एल. एम. पुराणे, फार्म. डी. विभागप्रमुख डॉ. एस. एच. रोहणे, तसेच सर्व प्राध्यापकवर्ग व सहविद्यार्थ्यांनी श्रद्धा सावंत हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

तसेच या यशासाठी आविष्कार समन्वयक डॉ. भारती व्ही. चवरे तसेच मार्गदर्शक श्री. शहू देशमुख यांचे मोलाचे, सातत्यपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस, फार्मसी विभाग, सातारा हे संशोधन व शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket