राज्यस्तरीय “सायंशिया ४.०” स्पर्धेत यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्म. डी. विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश
यशोदा टेक्निकल कॅम्पस, फॅकल्टी ऑफ फार्मसी येथील प्रथम वर्ष डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी.) शाखेच्या विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
ही स्पर्धा अरविंद गावळी कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथे आयोजित “सायंशिया ४.०” राज्यस्तरीय पोस्टर, ओरल व मॉडेल स्पर्धेत कु. सायली रवींद्र सोंटक्के आणि कु. अनुजा जगदीश दीक्षित यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्यांना रु. ३०००/- रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
“कालबाह्य औषध व्यवस्थापन” या विषयावर आधारित अभिनव संकल्पना सादर करत विद्यार्थिनींनी एक उपयुक्त वेबसाइट तयार केली व तिचे प्रभावी मॉडेलद्वारे सादरीकरण केले. स्पर्धेत एकूण २२ मॉडेल्समधून त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत हा मानाचा बहुमान मिळवला.
संस्थेच्या वतीने या दोन्ही विद्यार्थिनींचे तसेच त्यांच्या मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष मा. डॉ. अजिंक्य सगरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव, फार्मसी विभागप्रमुख डॉ. ए. एम. भागवत, एम. फार्म विभागप्रमुख डॉ. एल. एम. पुराणे, फार्म. डी. विभागप्रमुख डॉ. एस. एच. रोहणे तसेच सर्व प्राध्यापकवर्ग यांनी अभिनंदन व्यक्त केले.
या यशामागे मार्गदर्शक डॉ. सचिन एच. रोहणे यांचे सातत्यपूर्ण, मोलाचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. या घवघवीत कामगिरीमुळे यशोदा टेक्निकल कॅम्पसचा फार्मसी विभाग संशोधन व शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.




