बोपर्डी ग्रामपंचायतीने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ मध्ये घेतली आघाडी
वाई प्रतिनिधी -बोपर्डी ग्रामपंचायतीने शासन निर्णय निघाल्यापासून म्हणजेच ६ ऑगस्ट पासूनचा नियोजन पूर्वक आखणी करून त्यानुसार कामकाज सुरुवात केले. १७ सप्टेंबर रोजीचा ग्रामसभा तर उत्स्फूर्तपणे घेऊन हॉल मध्ये बसायला जागा शिल्ल्क राहिली नव्हती, त्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी ओटी सुरक्षित मातृत्वाची हा उपक्रम तर तालुक्यातील सर्वात सुंदर व भरगच्च व सर्व भगिनींना ग्रामपंचायत हेच आपले माहेर’ असल्याचे भावना बोलून दाखवल्या. सर्व भगिनिया ओटी भरणीचा कार्यक्रम पाहून सर्वाचे मन भारावून गेले होते.
सदर ग्रामसभेस व ‘ओटी सुरक्षित मातृत्वाची’ या कार्यक्रमास मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रज्ञा माने मॅडम व गट विकास अधिकारी, पं.स.वाई. श्री. विजयकुमार परीट साहेब, मा. सभापती, मा. उपसभापती, मा.पं.स.वाई. सदस्य, सर्व माझी सरपंच, उपसरपंच, सन्मानीय सदस्य, माझी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्मानीय लोकप्रतिनिधी व विद्यमान सर्व कार्यकारणी सदर ग्रामसभा मा. सरपंच श्री. शंकर गाढवे (बापू) यांचे अध्यक्षतेखाली आणि मा.उपसरपंच श्री. ऋषिकेश सुरेश गाढवे उपस्थित होते व मा. श्री. शंकर चिकटूळ (आण्णासाहेब) ग्रामपंचायत अधिकारी यांनी सचिव म्हणून काम पाहिले.
ग्रामसभेस गटविकास अधिकारी साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर सभेत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग घेण्याचे टाळ्या वाजवून सभेने मान्यता दिली. या अभियानात सहभाग घेण्यासाठी व सदर या विशेष ग्रामसभेस ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, जि.प. शाळांचे मुख्याध्यापक, भिमाशंकर हायस्कूल चे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांनी उपस्थित राहून आप आपल्या विभागाचे गुणांकन मिळतील याची ग्वाही दिली. ग्रामसभा यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांची प्रमुख भूमिका होती.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर पासुन आत्तापर्यंत सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये व परिसर तसेच महत्वाच्या ठिकाणा बरोबरच गावांतील अंतर्गत रस्ते, पाणवठे तसेच स्मशानभूमी व परिसर, बुद्धविहार व परिसर अशी सर्व ठिकाणे दहा दिवसांत ग्रामस्थ, जि. पं. शाळा बोपर्डी, हायस्कूल विद्यार्थी, आय टी आय विद्यार्थी व सर्व शासकीय कर्मचारी व पदाधिकारी मिळून प्रती आठवडा शेकडोंच्या संख्येने म्हणजेच ग्रामपंचायतीस असणा-या उद्दिष्टांपेक्षा अधिक संख्येने श्रमदान मध्ये सहभाग घेवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ मध्ये मोठी आघाडी घेतली असून, यांसाठी ग्रामपंचायत अधिकारी सकाळी आठ ते रात्री आठ असा वेळ देऊन मा. सरपंच (बापू) व सन्मानिय सदस्य व संपूर्ण शासकीय कर्मचारी टीम यांना सोबत घेऊन बोपर्डी ग्रामपंचायतीने सर्वांच्या सहभाग व सहकार्यने तालुक्यात आघाडी घेतली आहे.
