Home » ठळक बातम्या » आरोग्य » वाई अर्बन बँकेतर्फे 75 रक्तदात्यांकडून रक्तदान

वाई अर्बन बँकेतर्फे 75 रक्तदात्यांकडून रक्तदान

वाई अर्बन बँकेतर्फे 75 रक्तदात्यांकडून रक्तदान

वाई, दि. 22 – येथील दि वाई अर्बन को. आँप. बँकेच्या 103 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सामाजिक बांधिकलीप्रतिचा खारीचा वाटा उचलला. बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केलेला मानस व त्यास सर्वांनी दिलेला सहभाग अत्यंत मोलाचा आहे, असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनी व्यक्त केले.

शनिवारी वाई येथे झालेल्या रक्तदान शिबिरप्रसंगी बँकेचे पदाधिका-यांनी याबाबत माहिती दिली. सातारा येथील माऊली रक्तपेढीच्या सहकार्याने शिबीर घेण्यात आले. बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्याचे बँकेने ठरविले होते. त्यानुसार संचालक चंद्रकांत गुजर यांच्या हस्ते फीत कापून उपक्रम रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाईतील प्रधान कार्यालयात बँकेतील अधिकारी, संचालक व बँकेचे ग्राहक, व्यापारी असोसिएशनचे सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी. हितचिंतक यांनी यांत सहभाग घेतला. दुपारपर्यंत 75 मान्यवरांनी रक्तदान केले. त्यामध्ये सामाजिक जाणीवेचे भान ठेवून बँकेचे ज्येष्ठ संचालक विवेक पटवर्धन, मकरंद मूळये

अशोक लोखंडे, प्रितम भूतकर यांनी स्वतः रक्तदान करून यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे वाईतील व्यापारी असोसिएशन, विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. सहभागी रक्तदात्यांना माऊली पतपेढीच्यावतीने सन्मानपत्र देण्यात आले. 

बँकेचे संचालक माधव कान्हेरे, रमेश भुरमल, काशीनाथ शेलार, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक सीए. प्रवीण आवटे आदी याप्रसंगी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे यांनी सर्व सहभागी कार्यकर्ते, संस्था यांच्याप्रती कृतज्ञतापर आभार मानले. माऊली रक्तपेढीचे डाँ. गिरिश पेंढारकर, डाँ. रमन भट्टड, अजित कुबेर, माधव प्रभुणे व त्यांचे सहकारी यांनी रक्तसंकलन केले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी सन्मानचिन्ह देताना रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी अविनाश जोशी व संचालक अशोक लोखंडे, शेजारी बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. डाँ. शेखर कांबळे, संचालक काशीनाथ शेलार, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी व मान्यवर.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket