Home » ठळक बातम्या » भाजप नेते दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी अडकरणार लग्नबंधनात!

भाजप नेते दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी अडकरणार लग्नबंधनात! 

भाजप नेते दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी अडकरणार लग्नबंधनात! 

कोलकाता- पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष वयाच्या ६० व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत. ते आपली पक्ष सहकारी रिंकू मजूमदार यांच्याशी विवाह करत आहेत. हा विवाह आज, १८ एप्रिल २०२५ रोजी कोलकात्यातील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. ६० वर्षीय दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. सूत्रांनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष आणि देबांगशु भट्टाचार्य यांच्यासह अनेकांनी या प्रसंगी दिलीप घोष यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिलीप घोष यांच्या निकटवर्तीयांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, दोघांची भेट सकाळच्या फिरण्यादरम्यान झाली आणि कालांतराने त्यांचे नाते दृढ झाले. न्यू टाउन येथे खासगी समारंभात हा विवाह होणार असून, यात जवळचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, विवाहाचा प्रस्ताव वधू पक्षाकडून आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सकाळी घोष यांच्या न्यू टाउनमधील निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. एका निकटवर्तीय भाजप नेत्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल सामन्यादरम्यान दिलीप घोष आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीने एकत्र हजेरी लावली होती, त्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

दिलीप घोष यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले, “माझ्या आईला माझे लग्न व्हावे अशी इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत मी विवाह करत आहे. मी यापूर्वीप्रमाणेच सक्रिय राजकारणात राहीन. माझ्या वैयक्तिक आयुष्याचा माझ्या राजकीय कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही.”

रिंकू मजूमदार या दीर्घकाळापासून भाजप कार्यकर्त्या आहेत. त्यांनी पक्षाच्या महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, हातमाग कक्ष आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रिंकू यांचे हे दुसरे लग्न असून त्यांना एक मुलगा आहे, जो कोलकात्यातील सॉल्ट लेक येथे आयटी कंपनीत कार्यरत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

ठाकरे बंधू एकत्र येणार?

Post Views: 82  ठाकरे बंधू  एकत्र येणार   राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत

Live Cricket