Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भाजपा मध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतेही पद नाही: महेश जाधव सातारा जिल्हा प्रभारी

भाजपा मध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतेही पद नाही: महेश जाधव सातारा जिल्हा प्रभारी

भाजपा मध्ये सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतेही पद नाही: महेश जाधव सातारा जिल्हा प्रभारी

भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य करण्याचे काम सुरू आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रामध्ये दीड कोटी प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिले आहे, आज पर्यंत जवळपास एक कोटी पस्तीस लाखापर्यंत भाजपचे प्राथमिक सदस्य झाले आहेत, लवकरच उद्दिष्ट पूर्ण होईल याची सर्वांना खात्री आहे आणि त्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे काम चालू आहे 

भारतीय जनता पार्टीने प्रदेश कार्यालयातून पंच्याहत्तर जणांची एक समिती तयार केली असून, प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये एका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली आहे, या पदाधिकाऱ्यांनी पाच दिवस त्या जिल्ह्यामध्ये मुक्काम करून त्या जिल्ह्यातील सर्व विधानसभा , सर्व मंडले यांचा दौरा करायचा आहे, या दौऱ्यामध्ये त्यांनी राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सदस्यता वाढीसाठी प्रयत्न करायचा आहे, सातारा जिल्ह्यासाठी , या अभियानाचे जिल्हा प्रभारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे

प्राथमिक सदस्य नोंदणी बरोबरच सक्रिय सदस्य करण्याचे काम सुद्धा पक्षाने करण्यास सुरुवात केली आहे, ज्या पदाधिकारी कार्यकर्त्याचे कमीत कमी पन्नास प्राथमिक सदस्य स्वतःच्या रेफरल कोड वर झाले असतील त्यांनाच सक्रिय सदस्य करण्यासाठी चा फॉर्म दिला जाणार असून, प्रत्येक बुथवर तीन सक्रिय सदस्य करण्याचे उद्दिष्ट माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माननीय कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे 

भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय सदस्य साठीच्या अभियानाची सातारा जिल्ह्याची बैठक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे सक्रिय सदस्य अभियान प्रभारी श्री महेशजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य झाल्याशिवाय कोणतीही शासकीय जिल्हा , तालुका कमिटी, विशेष कार्यकारी अधिकारी, महामंडळे यावर नियुक्तीसाठी शिफारस केली जाणार नाही त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे उभे राहण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य होणे आवश्यक आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आपल्या रेफरल कोडवर पन्नास सदस्य पूर्ण करून सक्रिय सदस्य होण्यासाठी चा फॉर्म जमा करावा असे आवाहन सुद्धा सक्रिय सदस्यता अभियान सातारा जिल्हा प्रभारी महेश जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले 

यावेळी सक्रिय सदस्यता अभियान सातारा जिल्हा संयोजक आणि जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सातारा जिल्हा सहसंयोजक आणि सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सागर शिवदास, मनीषा पांडे, सुनील शिंदे, संतोष कणसे, रोहिदास पिसाळ, विकल्प शहा, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, संतोष जाधव, गणेश यादव, नंदकुमार सुर्वे, धनंजय चव्हाण, शंकरकाका शेजवळ, गणेश सत्रे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे , माजी उपनगराध्यक्ष अमोल कदम, फिरोज पठाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 405 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket