Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारच्या विविध भागातील दुभाजकातील वृक्ष पाण्याच्या प्रतीक्षेत

सातारच्या विविध भागातील दुभाजकातील वृक्ष पाण्याच्या प्रतीक्षेत

सातारच्या विविध भागातील दुभाजकातील वृक्ष पाण्याच्या प्रतीक्षेत

दुभाजकातील वृक्षवेली कोमजल्या. निसर्गप्रेमींतून तीव्र नाराजीचा सूर.

सातारा-सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहराच्या ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध दुभाजक निर्माण केले आहेत.शहराच्या सौंदर्यात भर पडावी व हरित सातारा चे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी या दुभाजकात लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड केलेली आहे. दुभाजकात लावण्यात आलेले वृक्ष सध्या बहरले असून शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात ते भर घालत आहेत.परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून या दुभाजकातील वृक्षांकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते.दुभाजकांमधील वृक्षांना सध्या पाणी मिळत नसल्याने दुभाजकातील वृक्षवेली वाळून चालल्या आहेत. या दुभाजकात आलेली मोठ मोठी वृक्ष ही असल्याचे दिसून येत आहे.विशेषतः शिवतीर्थ ते गोडोली नाका, जिल्हाधिकारी कार्यालय ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक, एस. टी. स्टँड परिसर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते जुना आर.टी.ओ ऑफिस, करंजे नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील दुभाजकामधील वृक्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असून संबंधित यंत्रणेने याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. 

 शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.यामुळे प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन महत्त्वाचे असून त्यासाठी दुभाजकातील वृक्ष हे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरतात.म्हणूनच ह्या दुभाजकातील वृक्षांची निगा राखणे आवश्यक आहे. 

 सुंदर सातारा हरित सातारा हे निसर्गप्रेमींनी पाहिलेले स्वप्न आहे.हरित सातारचे उद्दिष्ट ठेवून संबंधित यंत्रणेने यासाठी लाखो रुपये खर्च करून दुभाजकात वृक्ष लागवड केलेली आहे.यामध्ये गाळाची माती तसेच रासायनिक खते टाकून वृक्ष वाढवली आहेत.परंतु सध्या निगेअभावी हे वृक्ष कोमोजून चालले आहेत.शहराचे सौंदर्य वाढवणारे हे वृक्ष ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांना गारवा देतात.केवळ यंत्रणेतील सुसूत्रपणाचा अभावामुळे दुभाजकातील वृक्षांचे संगोपन धोक्यात आले आहे.संबंधित यंत्रणेने याबाबत जागृतपणे पाहणे गरजेचे आहे.

श्रीरंग काटेकर निसर्गप्रेमी सातारा.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 38 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket