अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » भुईंज हादरले! पोलिसांवर हत्याराने वार करून आरोपींची धूम; एक जेरबंद, इतरांचा शोध सुरू

भुईंज हादरले! पोलिसांवर हत्याराने वार करून आरोपींची धूम; एक जेरबंद, इतरांचा शोध सुरू

संशयास्पद दुचाकी अडवून चौकशी करताना पोलिसाच्या सरकारी कामात अडथळा; भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाई : भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुरूर, ता. वाई येथील बाजार तळावर काही लोक थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.४५ वाजता रात्रगस्तीचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सूरज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कदम व होमगार्ड हे घटनास्थळी गेले होते.

यावेळी तेथील व्यक्तींनी फलटण येथील काही व्यक्ती त्यांना मारण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार रात्रगस्तीचे पथक पारधी वस्ती सुरुर कडे जात असताना समोरून क्रमांक नसलेली संशयास्पद दुचाकी येताना दिसली. पोलिसांनी सदर दुचाकी थांबवून त्यावरील संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दुचाकीवरील व्यक्तींनी पोलिसांच्या शासकीय कर्तव्यात प्रतिकार करत पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्यावर हत्याराने वार करून त्यांना दुखापत केली संशितांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला असता ते दुचाकीवरून कच्च्या रस्त्याने पळून गेले.

या घटनेत पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून आहे.सदर घटनेप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे तसेच पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने प्रतिकार करून दुखापत केल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर प्रकरणातील एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले असून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांकडून तपास सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket