भारताला दुसरे ऑलिम्पिक पदक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज (दि.३० जुलै) कांस्य पदक पटकावले. दोघांनी अचूक लक्ष्यभेद करत भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे मनू भाकरचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.
ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात प्रत्येकी 10 शॉट्सच्या तीन मालिका असतात. सर्वाधिक गुण मिळवणारे संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो. अव्वल दोन संघामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांसाठी सामना होतो. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे संघ कांस्यपदकासाठी आमने-सामने होते. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रतामध्ये तिसरे स्थानासाठी पात्र ठरले होते. आज कांस्यपदकासाठी त्यांचा कोरियन जोडी ली वॉन-हो आणि ओ ये-जिन यांच्याशी सामना झाला. कांस्यपदकासाठी सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. सरबज्योतने ८.६ तर मनू१०.४ गुण घेत पिछाडीवर राहिले. मात्र यानंतर दाेघांनी दमदार कमबॅक केले. सलग चार शॉट्समध्ये दोघांचेही गुण अग्रस्थानी राहित ८-४ अशी आघाडी घेतली. यानंतर पाचव्या मालिकेत मनू भाकर10.6 गुण घेत निर्णायक आघाडीकडे वाटचाल केली. यानंतर भारतीय जाेडीने १४-१० अशी निर्णायक आघाडी घेत कांस्य पदकावर आपली माेहर उमटवली.
मनू भाकरच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके पटकवणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली आहे.
