Home » ठळक बातम्या » बनवडी फाट्यावर पुरवठा विभागाची धडक कारवाई; 98 हजार 375 रुपये किमतीची बेकायदेशीर 25 गॅस सिलेंडरसह 3 मशीन जप्त

बनवडी फाट्यावर पुरवठा विभागाची धडक कारवाई; 98 हजार 375 रुपये किमतीची बेकायदेशीर 25 गॅस सिलेंडरसह 3 मशीन जप्त

बनवडी फाट्यावर पुरवठा विभागाची धडक कारवाई; 98 हजार 375 रुपये किमतीची बेकायदेशीर 25 गॅस सिलेंडरसह 3 मशीन जप्त

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे रिक्षा तसेच वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याने या विरोधात पुरवठा शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आज बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कराड पुरवठा शाखेच्या वतीने बेकायदा गॅस भरण्यात येणाऱ्या विद्यानगरमधील बनवडी फाट्यावर हॉटेल शिवशाही पाठीमागे धडक कारवाई करण्यात आली. यावेळी २५ सिलेंडर तसेच तीन मशीन असा सुमारे 98 हजार 375 रुपये किमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील बनवडी फाटा येथील शिवशाही हॉटेलच्या पाठीमागील बाजूस बंद खोलीत बेकायदेशीरपणे रिक्षा वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती कराड पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी व पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांना मिळाली. यानंतर त्यांनी साडे बारा वाजण्याच्या सुमारास बनवडी फाट्यावर हॉटेल शिवशाही पाठीमागील जागेवर येऊन धडक कारवाई केली. कारवाईवेळी जागा मालक युवराज माळी यांच्याशी नायकवडी व ठोंबरे यांनी संपर्क साधला. त्यानंतर जागा मालकांनी बंद खोलीचे कुलूपचे चावी नसल्याचे सांगितल्यानंतर ठेवण्यात आलेली सिलेंडरच्या खोलीचे बंद असलेल्या कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करत सबंधित खोलीतील २५ गॅस सिलेंडर त्यामध्ये १९ भरलेल्या तर चार खाली अवस्थेत व तीन मशीन जप्त केले.

पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात भरलेले सिलेंडर आढळून आल्याने विद्यानगर परिसरात एकच खळबळ उडाली. आज दुपारी करण्यात आलेल्या कारवाईवेळी बनवडी पोलिस पाटील रोहित पाटील, तलाठी वैभव शितोळे, कर्मचारी महादेव पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

भारत गॅस एजन्सीचे सिलेंडर…

कराड शहरात गॅस टाक्यांचा पुरवठा करणाऱ्या भारत गॅस एजन्सीचे तब्बल २५ सिलेंडर बनवडी फाटा येथे टाकण्यात आलेल्या धाडीवेळी आढळून आले. १९ भरलेल्या अवस्थेत तर पाच सिलेंडर खाली स्वरूपात आढळून आले. दरम्यान इतक्या मोठ्या संख्येने सिलेंडर एजन्सीकडून कसे काय संबंधित बेकायदेशीरोने व्यवसाय करणाऱ्यास देण्यात आले याबाबत शंका निर्माण होत आहे.

बेकायदा सिलेंडर पुरवठ्यामागे अजून कोणाचा सहभाग आहे का त्याचा शोध घेणार : साहिला नायकवडी

आज बनवडी फाटा येथे बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर धडक कारवाई केली. या कारवाईनंतर आम्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असून या बेकायदेशीर सिलेंडर व्यवसायाच्या पाठीमागे अजून कोणी आहे का त्याचा शोध देखील घेणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडी यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान

Post Views: 33 महाबळेश्वर–पांचगणी : युनेस्को डेक्कन ट्रॅप्स वारशाची शान सातारा -(अली मुजावर) सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले महाबळेश्वर आणि

Live Cricket