Home » ठळक बातम्या » बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांच्याकडे रु 857 कोटी रकमेचा लाभांश सादर

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांच्याकडे रु 857 कोटी रकमेचा लाभांश सादर

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांच्याकडे रु 857 कोटी रकमेचा लाभांश सादर

पुणे दिनांक 21 जून 2024 : देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वित्तीय वर्ष 2023-24 साठी घोषित केलेला रु 857.16 कोटी रकमेचा लाभांशाचा धनादेश अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांच्याकडे सादर करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निधू सक्सेना यांनी बँकेचे कार्यकारी संचालक श्री आशिष पांडे आणि श्रीमती संतोष दुलार, प्रभारी एनबीसीए व्हर्टिकल, बैंक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव श्री विवेक जोशी यांच्या उपस्थितीत अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन ह्यांच्याकडे लाभांश रकमेचा धनादेश सादर करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे वित्तीय वर्ष 2024 साठी प्रत्येक समभागामागे रु 1.40 (14 टक्के) एवढा लाभांश घोषित करण्यात आला होता. सदर लाभांश प्रदानामुळे गत वित्तीय वर्षातील बँक ऑफ महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी प्रतिबिंबित होते. सन 2023 मधील रु 2602 कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत सन 2024 मध्ये बँकेच्या निव्वळ नफ्यात 55.84% वाढ होऊन बँकेने रु 4055 कोटी एवढा निव्वळ नफा कमावला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र सातत्याने सर्वोत्तम कामगिरीची नोंद करीत असून एकूण व्यवसाय व ठेवी संकलनात बँकेने सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये बँकेने आपल्या एकूण व्यवसायात 15.94% तर ठेवी संकलनात 15.66% वाढ नोंदविली आहे.

दर वर्षातील लक्षवेधक वित्तीय कामगिरीमुळे बँकिंग क्षेत्रातील एक मजबूत बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राने आपली जागा अधिक मजबूत झाल्याचे दाखवून दिले आहे. बाजारपेठेतील सातत्याने बदलत असलेल्या परीस्थितीशी सानुकुलीत करण्याची लवचिकता सातत्याने दर्शवून बँकेने सेवांचे वितरण आणि ग्राहकांचे समाधान याबाबत बँकेने आघाडी घेतली आहे.

बैंक ऑफ महाराष्ट्राच्या सर्वोत्तम कामगिरीत बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम प्रयत्न व समर्पित वृत्ती योग्य वेळी महत्वपूर्ण परीचालनात्मक निर्णय घेतल्यामुळे ते सर्वोत्तम कामगिरीत प्रतिबिंबित झाले आहेत. डिजिटल तंत्र व अधिक सुलभ ग्राहक स्नेही बँकिंग प्रणालीवर लक्ष केंद्रित केल्याने बँकेला निव्वळ नफा व वाढीची हा प्रक्षेपमार्ग कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे. आजघडीला 28 राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेशात बँकेच्या 2500 शाखा व 2206 एटीएम यंत्रे कार्यरत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 79 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket