अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत पिण्याच्या पाण्याव्यतिरीक्त उपसा बंदी

कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत पिण्याच्या पाण्याव्यतिरीक्त उपसा बंदी

कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत पिण्याच्या पाण्याव्यतिरीक्त उपसा बंदी

 सातारा –सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवरील (कोयना धरण ते कोयना संगमापर्यंत कोयना नदी) लाभधारकांनी कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ११,४९ मधील तरतुदीनुसार ७जून पर्यंत कोयना नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी करण्यात आली आहे. याकाळात केवळ पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे. 

उपसा बंदीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे.

दि.०४ जून ते ७ जून २०२६ पर्यंत उपसाबंदी राहील . दि. ८ जून २०२६ ते ११ जून २०२६ या कालावधीमध्ये उपसा सुरू राहील. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन

प्राप्त परिस्थितीनुसार पुढील नियोजन करणेत येईल.

 उपसा बंदी असलेल्या कालावधीत कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कोयना नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करणेत येईल, याची गांभीर्याने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे,

तसेच धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणी नाश टाळण्यास सहकार्य करावे. जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानून पाणी वाचवूया व देश वाचूया असे आवाहन कोयना सिंचन विभाग कोयना नगरचे कार्यकारी अभियंता वि.बा. सानप यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket