Home » राज्य » शिक्षण » शासकीय रेखा कला परीक्षेत बामणोली आश्रम शाळेचे यश

शासकीय रेखा कला परीक्षेत बामणोली आश्रम शाळेचे यश

शासकीय रेखा कला परीक्षेत बामणोली आश्रम शाळेचे यश

सातारा -२०२४-२५च्या शासकीय रेखा कला परीक्षेत शासनाच्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बामणोली,ता.जावली जि.सातारा. येथील बामणोली आश्रम शाळेतील बसलेल्या ११च्या ११ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून सर्व उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा शाळेचा निकाल 100% लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे जावळी तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री शिवेंद्रराजे भोसले साहेब(सा.बांधकाम मंत्री)यांनी याबाबत मोठे समाधान व्यक्त केले असून, अतिशय दुर्गम भागात असलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या त्यांच्या यशाचे मोठे कौतुक केले आहे. परीक्षेत एकूण ११ विद्यार्थी बसले होते. यामध्ये एलिमेंट्री परीक्षेत संदीप काळे,ओम दिसागज यांना ए ग्रेड मिळाली असून विजय डोईफोडे प्रेम सुतार यांना बी ग्रेड मिळली आहे. तर इंटरमिजिएट या परीक्षेत प्रशांत प्रकाश सुतार, कू. सुषमा गणपत गोरे,अनुजा मारुती काळे,आनंदा हरिबा कोकरे, सुनीता दगडू बावधाने ,अजय दगडू डोईफोडे यांना ए ग्रेड तर कू. तनुजा मारुती काळे हिला सी ग्रेड मिळाली असून विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत उत्तीर्ण झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प अधिकारी मा. श्री प्रदीप देसाई साहेब यांनी शुभेच्छा दिल्या असून, शाळेचे मुख्याध्यापक श्री आर. ए.रासकर सर यांनी कौतुक केले आहे. शाळेच्या यशामुळे विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे कलाशिक्षक मा.श्री. आर.एन.भालेराव, श्री.एन आर.दिनकर या शिक्षकांचे पालक वर्गाकडून मोठे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket