निःपक्षपणे केलेल्या कामामुळे बाळासाहेब सोनावणे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली; प्रमोददादा शिंदे
दि. ५/७/२४ : आपण केलेल्या कामामुळे शेतकरी, संस्था व व्यवस्थापन यांना कोणतीही अडचण न येता सर्वांशी समन्वय साधत लोकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे चातुर्य विरमाडचे सुपुत्र व चिंधवली सोसायटीचे सचिव बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब सोनावणे यांच्याकडे होते. संस्थेमध्ये काम करताना निःपक्षपणे केलेल्या कामामुळेच सर्वसामान्यांमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली, असे गौरवोदगार किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोदादा शिंदे यांनी काढले.
चिंधवली, ता. वाई येथील विकास सेवा सोसियटीमध्ये सचिव पदावर कार्यरत असणारे बाळकृष्ण सोनावणे यांच्या सेवानिवृत्तनिमित्त छोट्याखानी झालेल्या कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते.
प्रमोदादा शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेब सोनावणे यांनी आपल्या नोकरीची सुरूवात उडतरे येथील विकास सेवा सोसायटीमध्ये केली त्यानंतर त्यांनी विविध गावातील सोसायटीमध्ये काम केले. जांबमधील सोसायटीमध्ये काम करताना मला त्यांच्या कामाचा अनुभव घेता आला. त्यांचा स्वभाव जरी थोडासा तापट असला तरी समोर येणाऱ्या सभासदांना त्यांनी कधीच नाहक त्रास देऊन संस्थेला व व्यवस्थापनाला कधीही अडचणीत आणले नाही. सर्वाचा समन्वय साधतच त्यांनी आपल्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्री. सोनावणे यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी किसन वीरचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील व संचालक मंडळाच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक राजेंद्र सोनावणे यांनी प्रास्ताविक करत केले. यावेळी शामराव गायकवाड, कांतीलाल पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागताला उत्तर देताना श्री. सोनावणे म्हणाले की, माझ्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांनी केलेले असून त्यांचे उपकार कधीही न फिटण्यासारखे आहेत. आज मी जे काही आहे ते तात्यांमुळेच आहे. माझ्या कामाची सुरूवात १९९४ पासून उडतरे गावापासून झाली. तदनंतर जांब, खडकी, काळंगवाडी, खोलवडी, चिंधवली या गावांमध्ये मी जवळपास ३१ वर्षे सेवा केली. या कालावधीमध्ये मला सर्व संस्थांच्या प्रतिनिधींकडून मोलाचे सहकार्य मिळालेले होते. प्रमोददादांच्याबरोबर जांबच्या सोसायटीमध्ये काम करताना त्यांनी मला खुप मोलाचे सल्ले देत दिले. त्यांच्यामुळेच माझ्या स्वभावातही बदल होत गेला. ज्याप्रमाणे स्व. लक्ष्मणरावतात्यांनी मला प्रेम, स्नेह दिला त्याचप्रमाणे त्यांची पुढची पिढी मिलिंददादा पाटील, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील हे देत आहेत. त्यामुळे मी पाटील कुटुंबीयांच्या ऋणातुन कधीही मुक्त होणार नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमास किसन वीर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानोबा शिंगटे, कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, तोडणी वाहतुक संस्थेचे मॅनेजर बी. आर. सावंत, किकलीचे सरपंच दिपक बाबर, शामराव गायकवाड, बाळासाहेब पाटील, शंकर निकम, विक्रम पिसाळ, गणेश निकम, दिपक जाधवराव, अजय भोसले, महेश चव्हाण, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
