अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महिला व बाल संरक्षण कायद्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती गिरिस्थान नगरपरिषद मुलांची शाळा क्र. १ येथे मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला व बाल संरक्षण कायद्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती गिरिस्थान नगरपरिषद मुलांची शाळा क्र. १ येथे मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

महिला व बाल संरक्षण कायद्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती गिरिस्थान नगरपरिषद मुलांची शाळा क्र. १ येथे मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाबळेश्वर: महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गिरिस्थान नगरपरिषद मुलांची शाळा क्र. १, महाबळेश्वर येथे महिला व बाल संरक्षण विषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक प्रतिनिधींना विविध कायदे, बालहक्क, महिला सुरक्षा तसेच शासनाच्या बालसंगोपन योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  

कार्यक्रमात संरक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ (POSH Act) याविषयी माहिती दिली. महिलांवरील शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक अत्याचाराचे विविध प्रकार, त्याविरोधात उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, तसेच पीडित महिलांनी कोणत्या यंत्रणेकडे मदत मागावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांवर व मुलांवर होणारे मानसिक परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.  

यावेळी विद्यार्थ्यांना बाल न्याय कायदा २०१५, पॉक्सो कायदा २०१२, बालकामगार प्रतिबंध कायदा तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ यांची माहिती देण्यात आली. अल्पवयीन मुला-मुलींचे संरक्षण, बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठीची तरतूद, बालमजुरीचे दुष्परिणाम आणि बालविवाहामुळे मुलांच्या आरोग्य, शिक्षण व भविष्यावर होणारे गंभीर परिणाम याविषयी उदाहरणांसह माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी देखील विविध प्रश्न विचारून शंका उपस्थित केल्या असून त्यांचे समाधान करण्यात आले.  

संशयास्पद घटना, अत्याचार किंवा बालसुरक्षेशी संबंधित बाबी आढळल्यास तात्काळ १०९८ या चाइल्डलाईन टोल फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बालसंगोपन योजनेंतर्गत एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना शासनामार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक मदतीची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेत स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक राहावे आणि समाजातही जनजागृती करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.  

कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती लाभली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket