Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सातारा आरटीओमध्ये आता वाहनांची स्वयंचलित फिटनेस तपासणी; जुन्या पद्धतीला पूर्णविराम

सातारा आरटीओमध्ये आता वाहनांची स्वयंचलित फिटनेस तपासणी; जुन्या पद्धतीला पूर्णविराम

सातारा आरटीओमध्ये आता वाहनांची स्वयंचलित फिटनेस तपासणी; जुन्या पद्धतीला पूर्णविराम

सातारा (प्रतिनिधी)सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी अत्याधुनिक स्वयंचलित तपासणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे वाहनांची फिटनेस तपासणी अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद पद्धतीने होणार असून, पारंपरिक मॅन्युअल तपासणीची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.

या स्वयंचलित केंद्रात वाहनांचे ब्रेक, हेडलाईट, सस्पेन्शन, स्टीअरिंग, स्पीडोमीटर, अलाईनमेंट आदी महत्त्वाच्या बाबींची संगणकीकृत तपासणी केली जाईल. तपासणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी असल्याने निकाल अधिक विश्वासार्ह मिळणार असून, फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

सातारा आरटीओ कार्यालयात हलक्या व जड वाहनांसाठी स्वतंत्र तपासणी ट्रॅक उभारण्यात आले असून, एका वाहनाची तपासणी सुमारे १५ ते २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. दररोज सुमारे ३०० वाहनांची तपासणी करण्याची क्षमता या केंद्रात आहे.

या नव्या प्रणालीमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठीही हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वाहनधारकांना आता अधिक आधुनिक, वेगवान आणि पारदर्शक फिटनेस तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पूर्वी वाहनांची तपासणी मनुष्यबळावर आधारीत होती. आता ती स्वयंचलित यंत्राद्वारे केली जाते त्यामुळे तपासणीदरम्यान थोड्या त्रुटी आढळल्या तरी ते वाहन या ट्रॅकवर नापास होते. त्यामुळे वाहनांची सर्व वैध कागदपत्रे, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, स्पीड लिमिटर आणि रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेपसंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे वाहनधारकांनी सोबत आणणे बंधनकारक आहे.

– दशरथ वाघुले, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा

जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत रांजणी

Live Cricket