कुबोटा PRO588i-G भात हार्वेस्टरच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे ११ ऑगस्ट रोजी आयोजन
सातारा : शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या वतीने कुबोटा PRO588i-G या ६६ हॉर्सपॉवर इंजिनयुक्त स्वयंचलित भात हार्वेस्टर मशीनच्या अधिकृत विक्री शुभारंभ सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.अजय शेंडे उपस्थित राहणार असून, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या भात हार्वेस्टरची माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे सचिन शेळके व प्रवीण शेळके यांनी केले आहे.





