Home » ठळक बातम्या » एट युवर सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट सर्व सामान्यांना मार्गदर्शक-मा.विक्रमसिंह शिंदे

एट युवर सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट सर्व सामान्यांना मार्गदर्शक-मा.विक्रमसिंह शिंदे 

एट युवर सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट सर्व सामान्यांना मार्गदर्शक-मा.विक्रमसिंह शिंदे 

एट युवर सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट : फॅसिलिटी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचा भव्य शुभारंभ सीईओ सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोग्स्टिक सेंटरचे श्री विक्रम सिंह शिंदे ,श्री सुनील कदम यांच्या उपस्थितीत,अध्यक्ष कृतिशील निवृत्त कर्मचारी संस्था डॉक्टर प्रा श्री चंद्रकांत नलावडे यांचे शुभहस्ते दिनांक 6/ 11 /2024 बुधवार रोजी ५१८/१देवी कॉलनी प्रवेश द्वारा जवळ करण्यात आला .

याप्रसंगी या सेवा भावी संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा सुविधा व दैनंदिन जीवनात “दुरुस्ती “या समस्येला सोडविण्यासाठी आरोग्य विषयक तपासणी ,मार्गदर्शन , तपासणी शिबिरे समुपदेशन तसेच घरगुती दुरुस्तीमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल रिपेअरींग, टीव्ही ,मोबाईल दुरुस्ती व अन्य समाज उपयोगी सेवा पुरवताना रोजगार निर्मिती व येणाऱ्या अडचणींसाठी ही सेवा संस्था काम करणार आहे 

विविध क्षेत्रातील वकील, प्रथितयश व्यावसायिक यांच्यासाठी ,चर्चा सत्र ,मीटिंग यासाठी को वर्किंग स्पेस अत्यंत माफक व योग्य दरात 

वायफाय सेवे सह प्रोफेशनल कुरिअरचे कलेक्शन सेंटर सुविधा उपलब्ध केली आहे. तरी या सेवेचा संधीचा लाभ सातारा शहर परिसरातील गृहनिर्माण संस्था , अपार्टमेंट्स,सरकारी ,निम सरकारी कार्यालये , पतसंस्था,बँका व व्यावसायिक संस्थांनी घ्यावा असे आव्हान संचालक श्रीकांत देशमुख व वैद्यकीय सल्लागार डॉक्टर संगीता पाटील यांनी केले आहे. 

याप्रसंगी सातारा हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटरचे स्टाफ कर्मचारी व कृतिशील निवृत्त अधिकारी संस्थेचे सदस्य, सातारा डिनर क्लबचे श्री जाधव सर , सुनील दादा मोरे ,प्राध्यापक संभाजी कुटे ,निवृत्त पोलीस अधिकारी श्री सुनील घोलप व परिसरातील ज्येष्ठ नागरिक राजे भोसले , श्री नाथाजी बाबर सर , श्री सतीश कदम, डॉ भास्कर लोंढे सर, कन्सल्टंट फिजीशियन डॉ दत्तात्रेय मोरे,दैनिक सामना सातारा जिल्हा समन्वयक श्री गजानन चेणगे , प्रोफेशनल कुरिअरचे संचालक श्री सोनल बोधे, ओम डिझाईनचे दीपक बोभाटे,संजय जोशी, उदय चिटणीस, गोविंद भरमगुंडे,सौ अरुणा बिडवे ,सौ मनीषा बोतालजी ,सौ सुनीता देशमुख , प्रसाद देशमुख व हितचिंतक मित्रासह सर्वांनी शुभेच्छा दिल्या व संस्थेच्या कामकाजासाठी सहकार्य राहील असे सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 8 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket