वसंतगड येथे कृषिकन्यांचे आगमन
तांबवे –महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय कराड येथील कृषिकन्या वसंतगड येथील, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाल्या आहेत ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषि औदयोगिक व कार्यानुभवकार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना विस्तार शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यापिठाचे विविध उपक्रम विविध पीक ,उत्पादन पद्धती पिकांवरील रोग व किडीचे प्रकार आणि नियंत्रण तसेच नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देण्याकरिता कृषिकन्या काम करणार आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिकत्यांना शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतीविषयक प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव होण्याची संधी प्राप्त होणार आहे. वसंतगड गावचे सरपंच अमित नलवडे,ग्रामसेवक विशाल मोहिते तसेच रविंद्र चिंचकर आणि गावकरी यांनी कृषिकन्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल अडांगळे, डॉ. अर्चना ताटे डॉ राजेंद्र हासुरे, केंद्र प्रमुख डॉ राणी निंबाळकर, अधिष्ठाता प्रतिनिधी डाॅ.सतिश बुलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या रिद्धी खैरे, आर्या कुलकर्णी, वैष्णवी बाबर, त्रिवेणी कोमरा, स्नेहल स्नेहल लोंढे, श्रेया पाटील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविणार आहेत. आगमना बरोबरच कृषिकन्यांनी गावक-यांच्या मदतीने गावाची भौगोलिक माहिती घेतली गावाचा नकाशा तयार केला. अशाप्रकारचे अनेक उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.