Home » राज्य » शेत शिवार » कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

भुईंज : कारखान्याचे संस्थापक किसन वीरआबांनी भविष्यातील गरज ओळखुन या सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. सहकारी संस्था ही सभासदांच्या मालकीची असते ती कोणा एकाची किंवा खाजगी मालमत्ता नसते. त्यामुळे सभासदांनीही ऊस देताना विचार केला पाहिजे, ऊस देताना आपली संस्था वाचली पाहिजे, हिला पूर्वीप्रमाणे सुगीचे दिवस येणे गरजेचे आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी आर्थिक मदत मिळविलेली असल्याने सभासदांनो, तुम्ही फक्त ऊस घाला, बाकी जबाबदारी आमच्यावर सोडून द्या. पुर्वीचे दिवस किंवा त्यापेक्षाही चांगले दिवस तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी दिला.

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा गळित हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, बावधन तालुका सहकारी सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम , प्रतापराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे पाटील, रामभाऊ लेंभे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, चार वर्षापुर्वी सभासद शेतकऱ्यांच्या अट्टाहासाने कारखाना घ्यायला लावला. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती पाहता सर्वांचा विश्वास किसन वीर व खंडाळा कारखान्यावर वाढलेला दिसून येत आहे. दोन्ही कारखाने पुर्ण क्षमतेने चालतील यापद्धतीने तोडणी यंत्रणा भरण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्यासाठी आमच्या व्यवस्थापनाने १० ते ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ठ ठेवलेले आहे. हे गाठण्यासाठी आपण आम्हाला साथ द्या, दराची चिंता करू नका. मागील तीन सिझनमध्ये इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तुम्ही फक्त ऊस घालण्याची जबाबदारी पार पाडा, तुमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही पुर्ण करणार आहोत, याबाबत कोणीही साशंकता बाळगु नका. मी माझे काम केलेले आहे. कारखान्यातील बाकीचे काम खासदार नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे अगदी व्यवस्थितपणे करीत असून त्याचा पाठपुरावा माझ्यापर्यत पोहचतो. कमी वेळेत फक्त निरोप देऊन ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी बहुसंख्येने आले त्याबदल त्यांचे अभिनंदन करीत सर्वांनी आपला पिकविलेला ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास देऊन सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

प्रमोद शिंदे म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितिनकाका पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळेच असंख्य अडचणींवर मात करीत मोठ्या विश्वासाने आपण पुढे जात आहोत. किसन वीर कारखान्यावर आजपर्यत जवळपास ४ हजार तर खंडाळा कारखान्यावर ३ हजार मेट्रिक टनाची आवक होईल एवढी यंत्रणा दाखल झालेली असून उर्वरित यंत्रणाही लवकरच दाखल होणार आहे. मकरंदआबांनी शेतकऱ्यांची अश्रु पुसण्यासाठी जो त्याग केलेला आहे, त्याचा विचार करता आपला सर्व ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला घालून सहकार्य करावे असे सांगितले. बाळासाहेब सोळस्कर यांनी पूर्वीच्या संचालक मंडळावर ताशेरे ओढत नेता कसा असावा तर तो मकरंदआबांसारखा असावा असे सांगितले. यापुर्वी किसन वीर आबा होते तर आता मकरंदआबा आहेत. त्यामुळे सभासदांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगुन बुलढाणा जिल्ह्यातही आबांनी आपल्या कायाचा ठसा उमटविला असल्याचे सांगितले.

डिस्टीलरी बॉयलरचे पुजन संचालक संजय कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शर्मिला कांबळे तर गव्हाणीचे पुजन संचालक रामदास गाढवे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री गाढवे यांच्या हस्ते संपन्न झाले. या उभयतांचा सत्कार नामदार मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन विठ्ठल माने तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले.

कार्यक्रमास संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे,रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे संचालक चंद्रकांत ढमाळ, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,बबनराव साबळे अजय कदम, अरविंद कदम, उदयसिंह पिसाळ, मानसिंग साबळे, यशवंत जमदाडे, शशिकांत भोईटे, शामराव गायकवाड, शिवाजीराव महाडीक, मोहनराव जाधव, रमेश गायकवाड, पोपट जगताप, सत्यजित वीर, मदन भोसले, चरण गायकवाड, सूनिल शेवते, शामराव गाढवे, अजय कदम, सीमा जाधव, किरण साबळे-पाटील, शशिकांत पवार, मनोज देशमुख, मनोज पवार, भैय्यासाहेब डोंगरे, भारत खामकर, संग्राम पवार, संदिप डोंगरे, धनंजय बनकर, नानासो भिलारे, संपतराव शिंदे, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, श्रीकांत वीर, अक्षय निंबाळकर, अमृत गोळे, अब्दुल इनामदार, नानासाहेब भिलारे, विकासराव साळुंखे, ज्ञानोबा शिंगटे, बाळासोा शिंगटे, सुर्यकांत निकम, नितीन निकम, शुभम पवार, नारायण नलावडे, सुजीत जाधवराव, उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, विविध संस्थोचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

Post Views: 148 कार्यक्षेत्रातील सभासदांनी किसन वीर व खंडाळा कारखान्यास ऊस घालावा नामदार मकरंदआबा पाटील : गळित हंगाम शभारंभ उत्साहात

Live Cricket