अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » कोयना पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी थकीत पाणी पट्टी भरण्याचे आवाहन

कोयना पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी थकीत पाणी पट्टी भरण्याचे आवाहन

कोयना पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी थकीत पाणी पट्टी भरण्याचे आवाहन

सातारा दि. 17: कोयना पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील कोयना, तारळी, उत्तरमांड, उत्तरवांग, वांग व को.प. लघू पाटबंधारे प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी वापरणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याची थकीत पाणीपट्टी संबंधित शाखा कार्यालयात भरणा करुन त्याची रितसर पावती घ्यावी. थकबाकीदार शेतकरी, संस्था यांना त्यांचेकडील थकीत पाणीपट्टी रक्कम भरणा करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरुन लेखी नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. ज्यांना नजर चुकीने नोटीस मिळाली नसेल त्यांनी संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचे थकबाकीचा तपशील उपलब्ध करुन घ्यावा व त्यानुसार पाणीपट्टी रक्कम भरणा करुन त्याची रितसर पावाती घ्यावी.

पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी ज्या संस्था,शेतकरी यांना नोटीसा बजावून तसेच वेळोवेळी मागणी करुन पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद देणार नाहीत त्यांचा भविष्यात कोणतीही पूर्व सूचना न देता महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ४९ (ज) नुसार विद्युत पंपांना सील करुन पाणी पुरवठा खंडीत केला जाईल. थकबाकीसाठी पाणी पुरवठा खंडीत केल्यानंतर होणाऱ्या उभ्या पिकाचे नुकसानीस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही. कारवाई टाळण्यासाठी सर्व थकबाकीदार संस्था, शेतकरी यांनी त्यांच्याकडील सर्व थकीत पाणीपट्टीची रक्कम भरणा करुन जलसंपदा विभागास पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket