अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा :- राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या माध्यमातून भारत कौशल्य स्पर्धा २०२६-२७ या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जात असून, विविध व्यावसायिक व तांत्रिक तसेच इतर कौशल्यांमध्ये २३ वर्षांखालील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते.

जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावरील निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील भारत कौशल्य २०२६-२७ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर जागतिक स्तरावरील जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळाळी देण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://www.skillindiadigital.gov.in/home या वेबसाईटवर भेट द्या अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, ०२१६२ २३९९३८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket