Home » राज्य » प्रशासकीय » इंडिया स्किल स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

इंडिया स्किल स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

इंडिया स्किल स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

सातारा: महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि भारत सरकारच्या नैशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इंडिया स्किल्स २०२६-२७ या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेची नोंदणी सुरु झाली आहे. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती. अ.मु. पवार यांनी केले आहे.

स्पर्धेतील विविध कौशल्य प्रकारांची सविस्तर माहिती आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया https://www.skillindiadigital.gov.in/home या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती किंवा मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२१६२ २३९९३८ भ्रमणध्वनी-क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा पुणे, दि.२८: महाराष्ट्र

Live Cricket