माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवस कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
सातारा :- कारगिल विजय दिवस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यालयातील पहिल्या मजल्यावर साजरा होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हयातील, भारतमातेच्या रक्षणार्थ कारगिल युध्दामध्ये हुतात्म पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता तसेच या युध्दामध्ये दिव्यांगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारक यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि माजी सैनिकांचे अवलंबित यांनी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.





