माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा :- सातारा जिल्हयातील १९८६ पूर्व सेवा निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी कुटुंब निवृत्ती वेतन करीता अभिलेख कार्यालयाकडे Joint Notification करणे गरजेचे आहे तरी माजी सैनिक हयात असल्यास या कार्यालयात पी. पी. ओ. सैन्य सेवा पुस्तिका माजी सैनिक ओळखपत्र घेवून स्वतः अथवा कुटुंबातील व्यक्ती द्वारा संपर्क करावा.
माजी सैनिक हयात नसल्यास पत्नीने स्वतः अथवा कुटुंबातील व्यक्तीने माजी सैनिक यांचा पी. पी. ओ. सैन्य सेवा पुस्तिका माजी सैनिक ओळखपत्र आणी पतीचा मृत्यूचा दाखला घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क करावा. माजी सैनिक व पत्नी हयात नसल्यास कुटुंबातील प्रमुखाने या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.





