कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सातारा दि. 17 :- महाराष्ट्र शासनाच्या मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामुहिक विवाह सोळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र दाम्त्पत्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार सामुहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या वधूचे वडील, आई किंवा पालक यांचे नावे 25 हजार अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येते. तसेच सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून प्रति पात्र जोडपे 4 हजार इतके अनुदान देण्यात येते.
या योजनेच्या लाभासाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक सुजीत बर्गे यांनी केले आहे.




