सर्व सातारकर नागरिकांना आवाहन : उद्या सातारा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा पदभार सोहळा
सातारा –उद्या शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सातारा नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष श्री. अमोलजी मोहिते यांच्या पदभार स्वीकाराचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा पदभार स्वीकार समारंभ उद्या दुपारी ४ वाजता, सातारा नगरपालिका कार्यालय, केसरकर पेठ, सातारा येथे होणार असून, या कार्यक्रमास सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तसेच सातारा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या पदभार सोहळ्याच्या निमित्ताने सातारा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




