शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फलटण येथे प्रवेश घेण्याचे आवाहन
सातारा दि. 10 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई याचे मार्फत राबविण्यात येणा-या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फलटण, येथील प्रवेश सत्र २०२६ चे प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट २०२६ साठी विविध व्यवसायांचे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. इच्छुक 10 वी उत्तीण विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एन. के. माने यांनी केले आहे.
ड्रेस मेकिंग, यांत्रिक डिझेल, संधाता हे कोर्स एक वर्षाचे असून जोडारी, वीजतंत्री इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे कोर्स दोन वर्षांचे आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. माहिती विभागाच्या www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




